Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

'आयडिया' देणार ४जी स्मार्टफोनवर २ हजार रूपयांचे कॅशबॅक

Idea
आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून अर्थात आजपासून लागू होणार आहे. या ऑफरमध्ये आयडिया कोणत्याही ब्रॅण्डचा ४जी स्मार्टफोन घेणा-या ग्राहकांना २ हजार रूपयांचं कॅशबॅक देणार आहे. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे २२ फेब्रुवारीपासून शाओमीच्या रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे. अशात आयडियाची ही ऑफर या फोनवरही लागू होणार आहे. 
 
रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो स्मार्टफोनचा पुढील सेल २८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता होणार आहे. आयडियाने सांगितले की, ही ऑफर पोस्टपेड आणि प्रीपेड  दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. आयडिया सेल्यूलरचे चीफ मार्केटींग ऑफिसर शशी शंकर म्हणाले की, आमचं लक्ष्य ४जी स्मार्टफोन स्वस्त करून ग्राहकांना ४जी मध्ये अपग्रेड करणं आहे. आम्ही या दृष्टीनेच काम करतोय. आणि जास्तीत जास्त लोकांना ४जी स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिंगापूरमध्ये प्रत्येक नागरिकाला सरकारकडून बोनस