Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारत अजूनही मागेच

इंटरनेटच्या स्पीडमध्ये भारत अजूनही मागेच
जगभरात 4G चा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता 5G सेवा देखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. तरीही  इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत अजूनही पिछाडीवर आहे. ओपनसिग्नलने याबाबतचा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये जगभरातील सर्व इंटरनेट स्पीडचा अभ्यास केला गेला.
 
ओपनसिग्नलच्या रिपोर्टनुसार, देशात सध्या 4G इंटरनेटचं 86.3 टक्के कव्हरेज आहे. 4G सेवा पुरवण्यामध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेलाही मागे टाकलं आहे. पण असे असले तरी इंटरनेट स्पीडच्या यादीत भारत सर्वात खालच्या स्थानावर आहे.
 
रिपोर्टनुसार, 2017 मध्ये भारतात 4G इंटरनेट स्पीड 6.07 MBPS होता. तर पाकिस्तानमध्ये 4G स्पीड 13.56  MBPS होता. श्रीलंकेत हाच स्पीड 13.95 MBPS होता.
 
इंटरनेट स्पीडच्या टॉप पाच देशांमध्ये सिंगापूर अव्वल स्थानी आहे. सिंगापूरमध्ये 4G चा इंटरनेट स्पीड 44.31 MBPS आहे. यात दुसऱ्या स्थानावर नेदरलँड असून, तिथे 4G इंटरनेट स्पीड 42.12 एमबीपीएस आहे. तिसऱ्या स्थानावर नॉर्वे 41.20 MBPS, दक्षिण कोरिया 40.44 MBPS, तर पाचव्या स्थानावर हंगेरी 39.18 MBPS स्पीड मिळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या