Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे
, शुक्रवार, 16 मार्च 2018 (15:33 IST)

आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या तुलनेत खूप अधिक आहे. ओपेन सिग्नल रिपोर्टनुसार, नवी मुंबईत 4G इंटरनेट स्पीड ८.७२ एमबीपीएस आहे. तर देशातील दक्षीण भारतातील असलेले  चेन्नईने मार्च २०१७ मध्ये 4G इंटरनेटचा स्पीड दुप्पट झाला आहे. यामध्ये चेन्नई येथे पूर्वी हा स्पीड ४.४ एमबीपीएस होता. मात्र ८.५२ एमबीपीएस इतका झाला आहे. तर कोलकत्ता येथे ८.४६ एमबीपीएससोबत तिसऱ्या स्थानावर आहे. भारतात 4G जियोचे जबरदस्त प्रस्थ असताना देखील पूर्ण जगातील आकड्यांनुसार 4G इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा क्रमांक खालचा आहे. तर भारताने 4G इंटरनेट स्पीडच्या जगात ८२.२६% सोबत १४ वे स्थान प्राप्त केले आहे. सिंगापूरचा प्रथम क्रमांक लागतो. ४४.३१ एमबीपीएस स्पीडसोबत सिंगापूर जगात क्रमांक एक स्थानी आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी गेला जेलमध्ये