Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या प्रीपेड योजनांमध्ये मिळणार आहे अमर्यादित कॉल आणि डेटाची सुविधा, किंमत 150 रुपयांपेक्षा ही कमी

या प्रीपेड योजनांमध्ये मिळणार आहे अमर्यादित कॉल आणि डेटाची सुविधा, किंमत 150 रुपयांपेक्षा ही कमी
, बुधवार, 8 जानेवारी 2020 (16:57 IST)
टेलिकॉमच्या दुनियेत सध्या जिओ, एयरटेल, आणि वोडाफोन -आयडिया अश्या हजारो प्रीपेड योजना आहेत. ज्यामध्ये धारकांना अमर्यादित डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे. पण या सर्व रिचार्ज योजनांचे दर महाग झाले आहे. त्या मुळे योजना निवडण्यात अडचणी येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तीन कंपन्यांचा काही निवडक योजना आणल्या आहे. त्यांची किंमत 150 रुपयांपेक्षा कमी आहे.   
 
रिलायन्स जिओची 129 रुपयांची योजना  :- 
या योजनेत जिओ धारकांना 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस सुविधा मिळेल. तसेच, धारक   जियो-टू-जियो नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यात सक्षम असतील पण त्यांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 एफयूपी मिनिटं मिळतील. या पॅकची वैद्यता 28  दिवसाची असणार.   
 
रिलायन्स जिओची 149 रुपयांची योजना  :-
या योजनेंतर्गत जिओ धारकांना 1 जीबी डेटा (एकूण 24 जीबी डेटा) आणि 100 एसएमएसची सुविधा मिळणार आहे. तसेच, धारक जिओ-टू-जिओ नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यास सक्षम असतील, पण त्यांना अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 300 एफयूपी मिनिटं मिळतील. या पॅकची वैधता 24 दिवस आहे.
 
एअरटेलची 149 रुपयांची योजना  :- 
या योजनेंतर्गत एअरटेल धारकांना 2 जीबी डेटासह 300 एसएमएसची सुविधा मिळेल. तसेच, धारक कुठल्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यास सक्षम असतील. एवढेच नव्हे तर कंपनी या योजनेच्या ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रीमवर ऍक्सेस मोफत देईल. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.
 
व्होडाफोन-आयडियाची 149 रुपयांची योजना :-
या योजनेंतर्गत धारकांना 2 जीबी डेटा आणि 300 एसएमएस मिळतील. तसेच, धारक कुठल्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्यास सक्षम असतील. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.
 
व्होडाफोन-आयडियाची 79 रुपयांची योजना :-
या पॅकमध्ये धारकांना 64 रुपयांचा टॉकटाइम मिळेल. याव्यतिरिक्त, कंपनी 200 एमबी डेटाची सुविधा देत आहे. या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आयपीएलचा रोज एकच सामना?