Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिओने नॉर्थ ईस्ट सर्कलच्या सर्व 6 राज्यांमध्ये एकाच वेळी ट्रू 5G लाँच केले

जिओने नॉर्थ ईस्ट सर्कलच्या सर्व 6 राज्यांमध्ये एकाच वेळी ट्रू 5G लाँच केले
, शुक्रवार, 27 जानेवारी 2023 (13:56 IST)
नवी दिल्ली- रिलायन्स जिओचे ट्रू 5G उत्तर पूर्वेतील चीनच्या सीमेवर पोहोचले आहे. Jio ने टेलिकॉमच्या नॉर्थ ईस्ट सर्कलमधील सर्व 6 राज्यांच्या राजधानी ट्रू 5G नेटवर्कशी जोडल्या आहेत.
 
अरुणाचल प्रदेशातील इटानगर, मणिपूरमधील इंफाळ, मेघालयातील शिलाँग, मिझोराममधील आयझॉल, नागालँडमधील कोहिमा आणि दिमापूर आणि त्रिपुरातील आगरतळा आता जिओ ट्रू 5जी नेटवर्कशी जोडले गेले आहेत. 27 जानेवारीपासून 6 राज्ये आणि 7 शहरांमध्ये Jio वापरकर्त्यांना Jio वेलकम ऑफर दिली जाईल. ऑफर अंतर्गत, वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 Gbps+ वेगाने अमर्यादित डेटा मिळेल.
 
नॉर्थ ईस्ट सर्कलमध्ये दुर्गम भागांव्यतिरिक्त, हा परिसर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वाचा आहे. Jio ने येथील सर्व 6 राज्यांना ट्रू 5G शी जोडून सर्कलचा सर्वात मोठा रोलआउट केला आहे. कंपनीचा दावा आहे की डिसेंबर 2023 पर्यंत नॉर्थ ईस्ट सर्कल मधील सर्व शहर आणि सर्व तालुक्यांमध्ये जिओ ट्रू 5G सेवा प्रदान केली जाईल.
 
याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “जिओला आजपासून नॉर्थ-ईस्ट सर्कलकडील सर्व सहा राज्यांमध्ये ट्रू 5G सेवा सुरू करण्याचा अभिमान वाटत आहे. हे प्रगत तंत्रज्ञान येथील लोकांसाठी विशेषत: आरोग्य क्षेत्रात त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह बदल घडवून आणेल. याव्यतिरिक्त ते कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रांना प्रोत्साहन देईल. Jio True 5G ने बीटा लॉन्च केल्यापासून 4 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 191 शहरांमध्ये पोहोचले आहे. उत्तर-पूर्व सर्कल डिजिटायझेशन करण्यासाठी राज्य सरकारांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

iNCOVACC Vaccine: प्रजासत्ताक दिनी कोरोना विरूद्ध iNCOVACC भारतात लाँच झाली