Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीओ युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करणार

जीओ युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करणार
, बुधवार, 9 जानेवारी 2019 (08:49 IST)
रिलायन्स जिओने JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने एक नवी अपडेट जारी केले आहे. याद्वारे JioPhone मध्ये सुद्धा hotspot फीचर जोडले जाईल आणि इंटरनेट दुसऱ्या युजर्संना वापरता येईल शकेल.  
 
नवीन अपडेट फीचर JioPhone च्या सर्व युजर्संना पाठविले जाणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व युजर्सपर्यंत हे फीचर पोहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीकडून आधीच सांगण्यात आले होते की, जिओफोनमध्ये लवकरच हॉटस्पॉट फीचर दिले जाईल. 
 
Settings मध्ये जाऊन Internet Sharing टॅबमध्ये hotspot फीचर चेक करा. जर, फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचा ऑप्शन दिसला नाही तर अद्याप तुमचा फोन अपडेट झाला नाही आहे. फोन अपडेट केल्यानंतर हे नवीन फीचर  दिसेल.
 
असा करा  hotspot चा वापर
- फोनच्या Settings मध्ये गेल्यानंतर Internet and Sharing ऑप्शनमध्ये जा. 
- Internet and Sharing ऑप्शनमध्ये Wi-Fi hotspot मिळेल. 
- Wi-Fi hotspot ऑप्शन ऑन करा.
- त्यानंतर हॉटस्पॉट नेटवर्कला नाव आणि पासवर्ड सेट करु शकता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी दोन दिवसापासून संपावर