Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॅपटॉप ला स्वच्छ करणाऱ्या स्वस्त टूल्स बद्दल जाणून घ्या

लॅपटॉप ला स्वच्छ करणाऱ्या स्वस्त टूल्स बद्दल जाणून घ्या
, सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (20:54 IST)
सध्या कोरोनाच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जर आपण घरून काम करत असाल तर आपला  लॅपटॉप काही वेळा खूप घाणेरडा होऊन त्यावर धूळ साचून त्याच्या डिस्प्ले आणि कीबोर्डवर जमून बसते. बरेच लोक लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी घरात पडलेले कोणतेही कापड वापरतात किंवा थोडे पाणी फवारून स्वच्छ करतात. या पद्धतींमुळे लॅपटॉप खराब होऊ शकतो, परंतु जर आपल्याला  लॅपटॉप स्वतः स्वच्छ करायचा असेल तर त्यासाठी काही टूल्सची आवश्यकता असते, ज्या टूल्सचा वापर करून आपण आपला लॅपटॉप चकचकीत करू शकता. 
चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 मऊ ब्रश-आपण  टूथब्रश पाहिला असेल, परंतु लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारा मऊ ब्रश कीबोर्डमधील जागा सहजतेने आत जाऊन येथे असलेली घाण साफ करण्यासाठी पातळ आहे. हा ब्रश खूप मऊ असून धूळही सहज खेचतो.
 
2 मायक्रोफायबर कापड-मायक्रोफायबर कापड बहुतेकदा स्क्रीनवरील घाण साफ करण्यासाठी वापरले जाते आणि ते कोणत्याही प्रकारचे डाग सोडत नाही. या वर  धूळ चिकटलेली असते आणि ती सहज साफ केली जाते.
 
3 वाइपर स्प्रे-लॅपटॉपचा डिस्प्ले स्वच्छ करण्यासाठी आता बाजारात वायपर स्प्रे आहे, ज्यामध्ये एका बाजूला स्प्रे साफ करण्यासाठी जागा आहे आणि दुसऱ्या बाजूला वायपर देखील बसविण्यात आले आहे जेणेकरून दोन्ही एकाच वेळी करता येतील. हे विशेषत: लॅपटॉपसाठी बनवलेले आहे आणि बरेच प्रभावी आहे आणि बाजारात चांगलेच लोकप्रिय आहे.
हे सर्व टूल्स आपण कॉम्बोमध्ये खरेदी करू शकता, ज्याची किंमत ₹ 200 ते ₹ 300 दरम्यान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs WI: वेस्ट इंडीज T20 मालिकेतून बाहेर, भारत ICC क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला