Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता इंटरनेट शिवाय व्हाट्सअँप वापरता येईल कसे काय जाणून घ्या

आता इंटरनेट शिवाय व्हाट्सअँप वापरता येईल कसे काय जाणून घ्या
, मंगळवार, 22 मार्च 2022 (15:37 IST)
व्हाट्सअँप हे सर्वात जास्त वापरण्यात येणारे मेसेंजिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वॉटसअँप  सातत्याने नवीन नवीन फीचर्स आणतात. व्हाट्सअँप ने आपल्या मल्टी डिव्हाईस फिचरला युजर्स साठी आणले आहे. हे फीचर्स बीटा व्हर्जन मध्ये उपलब्ध होते. आता व्हाट्सअँप च्या  स्टेबल व्हर्जन मध्ये युजर्स आपल्या प्रायमरी स्मार्टफोनवर  डेस्कटॉप मध्ये देखील वापरू शकतात. या साठी इंटरनेट असणे आवश्यक नाही.
 
या शिवाय व्हाट्सअँप ने जाहीर केले आहे की नवीन फीचर्स मार्च पर्यंत सर्व ios मोबाईल साठी आणि एप्रिल पर्यंत सर्व अँड्रॉइड फोनवर उपलब्ध होणार. 
 
प्रत्येक डिव्हाईस स्वतंत्ररूपात व्हाट्सअपने कनेक्ट केले जाईल. अँड टू अँड इन्क्रिप्शनच्या माध्यमाने सर्व पातळीची गोपनीयता आणि सुरक्षा लक्षात ठेऊन हे सक्षम केले जाणार.
 
व्हाट्सअप मल्टी डिव्हाईस लिंक करण्यासाठी -
अँड्रॉइड युजर्स साठी -
* सर्वप्रथम फोन मधील व्हाट्सअँप अँप उघडा.
* आता More Option> मध्ये  Linked Devices वर क्लिक करा.
*  Link A Device टॅप करा.
* डिव्हाइसमध्ये बायोमेट्रिक अंथेंटिकेशन आहे तर ऑनस्क्रीन सूचना अवलंबवा.
* आपल्या डिव्हाइसमध्ये बायोमेट्रिक अथेंटिकेशन इनेबल नसल्यास फोन अनलॉक करण्यासाठीच्या पिन ला द्यावे. 
* आता QR कोड स्कॅन करून दुसऱ्या डिव्हाइसला लिंक करा.  
 
iPhone यूजर्स साठी -
* सर्वप्रथम फोन मधील व्हाट्सअँप अँप उघडा.
* आता व्हाट्सअँप सेटिंग्स मध्ये जावे.
* लिंक्ड डिव्हाइसवर क्लिक करा.
* नंतर Link A Device पर्यायावर क्लिक करा
*  iOS 14 किंवा त्यानंतरचे व्हर्जन चे आयफोन मोबाईल वापरत असल्यास फोन अनलॉक करा.
* नंतर QR कोड स्कॅन करून डिवाइस लिंक करा.
अशा प्रकारे आपले डिव्हाईस लिंक झाल्यावर मोबाईलवर इंटरनेट कनेक्शन नसल्यास आपण डेस्कटॉप किंवा वेब व्हर्जन मध्ये व्हाट्सअप वापरू शकता. आता युजर्स 4 डिव्हाईस मध्ये एकच व्हाट्सअप वापरू शकतात. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओव्हनमध्ये दोन महिन्यांच्या मुलीचा मृतदेह आढळला