Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp मेसेजमधून Malware व्हायरस, अँड्राईड युजर्सं आहे टार्गेट

WhatsApp मेसेजमधून Malware व्हायरस, अँड्राईड युजर्सं आहे टार्गेट
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:15 IST)
व्हॉट्सअॅपवरील एका धक्कादायक मेसेजबाबत माहिती समोर आली आहे ज्यात अँड्राईड युजर्स टार्गेट केल्या जात असल्याची माहिती मिळत आहे. व्हॉट्सअॅप मेसेजमधून Worm नावाचा व्हायरस मोबाइलमध्ये शिरत आहे. हा व्हायरस आढळणारा मेसेज आपण कुठल्याही ग्रुप किंवा पर्सनल संपर्कवर पाठविल्यास फोनला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
मालवेयर मोबाइलमध्ये शिरल्यावर जे आपल्याला मेसेज करतील त्यांना देखील आपोआप मेसेज रिप्लाय स्वरुपात पोहचेल अर्थात व्हॉट्सअॅप ऑटोरिप्लाय केला जाईल. एका सिक्युरिटी रिसर्जमध्ये ही बातमी समोर आली आहे. या व्हायरसमुळे ऑटोरिप्लाय दिले जात आहे.
 
या मेसेजमध्ये एक फेक लिंक असून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं जातं. एका तासात एक युजरला ही लिंक पाठवण्यात येते. हे फेक अॅप डिजाइन करुन लोकांना फसवले जात आहे.
 
सावध रहा
फोनमध्ये अनोळखी अॅप्सला परनावगी देऊ नका. फोन परवानगी मागेल तेव्हा नकार द्या. अशाने मोबाईलमध्ये व्हायरसचा धोका टळू शकतो. 
आपण मोबाईलच्या Settings मध्ये जाऊन Apps पर्याय निवडा आणि Special Access वर क्लिक करा. नंतर install unknown apps पर्याय दिसेल. तिथे परवानगी न देण्यावर क्लिक करा. अशात अनोळखी अॅपला आपल्या मोबाईलमध्ये प्रवेश मिळणार नाही.
तसेच सिक्युरिटी ऑपरेशनमध्ये जाऊन अननोन सोर्स पर्याय बंद करा. 
अॅटीव्हायरस अॅप वापरुन व्हायरस मोबाईलमध्ये येण्यापासून रोखता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आई वडीलांची 12 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या