Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Meta: अॅड फ्री सबस्क्रिप्शन सेवा सुरू, फेसबुक-इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार

Meta:  अॅड फ्री सबस्क्रिप्शन सेवा सुरू, फेसबुक-इन्स्टाग्राम वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार
, बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (18:02 IST)
मेटा ने संपूर्ण महिन्याच्या चाचणीनंतर युरोपमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुक साठी जाहिरात-मुक्त सदस्यता मॉडेल लाँच केले आहे. मेटाच्या या सेवेअंतर्गत पुढील महिन्यापासून युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्राम जाहिरातीशिवाय वापरू शकतात. 
 
डेटा गोपनीयतेबाबत युरोपियन युनियनचे नवीन नियम लागू केल्यानंतर मेटाने हा निर्णय घेतला आहे. मेटा म्हणतो की, जर आम्ही युजर्सचा डेटा जाहिरातींसाठी वापरू शकत नसलो तर आम्हाला त्यासाठी पैसे द्यावे लागतील. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सशुल्क सेवांअंतर्गत वापरकर्त्यांना जाहिरातमुक्त अनुभव मिळेल. 
 
फेसबुक आणि इंस्टाग्रामची ही सदस्यता 18 वर्षे आणि त्यावरील वापरकर्त्यांसाठी आहे. सध्या, ही सेवा युरोपियन युनियन देशांसाठी आहे, जरी ती भारतासारख्या देशात सुरू केली जाऊ शकते, कारण भारत ही मेटासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
 
ही सेवा उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबर 2023 पासून युरोपियन युनियन (EU), युरोपियन इकॉनॉमिक एरिया (EEA) आणि स्वित्झर्लंडमध्ये सुरू होत आहे. वेबवर सेवेची किंमत प्रति महिना EUR 9.99 (अंदाजे रु 880) आणि iOS आणि अँड्रॉइड  वर प्रति महिना EUR 12.99 (अंदाजे रु 1,100) आहे.
 





Edited by - Priya Dixit   
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्रालयाला टाळं ठोकण्याचा प्रयत्न,आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं