Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Mozilla ने आणला 4 एमबी पेक्षा कमी आकाराचा Firefox Lite अॅप

Mozilla ने आणला 4 एमबी पेक्षा कमी आकाराचा Firefox Lite अॅप
, गुरूवार, 14 मार्च 2019 (14:12 IST)
फायरफॉक्स लाइट भारतात लॉचं झाला आहे आणि हे अँड्रॉइडला सपोर्ट करेल. याचा आकार 4 एमबी पेक्षादेखील कमी आहे. ओरिजन फायरफॉक्स 10 एमबी पर्यंतचा आहे. या अॅपमध्ये स्क्रीनशॉट द कॉल पेज नावाचा फीचर आहे, जे स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय देतो ज्यामुळे आपण आवश्यक कंटेंट सेव्ह करू शकता किंवा ऑफलाईन असतानाही ते वापरण्यास सक्षम होऊ शकतात. 
 
मोझीला दावा करतो की हा लाइट अॅप प्रायवेट ब्राउझिंगचा पर्याय देखील देतो. तसेच हे ट्रॅकिंगपासून संरक्षण करण्याची सुविधा ही देतो. यातील आणखी एक फीचर म्हणजे कंपनीने या लाइट फीचरमध्ये जवळजवळ त्या सर्व सुविधा दिल्या आहे जे सामान्य मोझीला ब्राउझर अॅपमध्ये असतात. कंपनीच्या मते, मोझीला फायरफॉक्स लाइट नाइट मोडला सपोर्ट करतो. अँड्रॉइड वापरकर्ते या अॅपला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकतात. Google PlayStore वर हे Firefox Lite नावाने उपलब्ध आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियात पहिल्यांदाच हे लॉचं केलं गेलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात का? जाणून घ्या त्यांचे ग्रह नक्षत्र