हॉट्सऍप युझर्ससाठी आणखी एक सुविधा देणार आहे. आपल्या आठव्या वाढदिवसानिमित्त व्हॉट्सऍप स्टेटस अपडेट करण्याचे एक खास फिचर ऍपमध्ये लवकरच समाविष्ट करणार आहे. याद्वारे युझर्स फोटो, व्हिडिओ आणि जीफच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक क्षण मित्रांसोबत शेअर करू शकतील.
आतापर्यंत व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये आपली भावना एखाद्या वाक्यातूनच व्यक्त करता येत होती. फार फार तर त्यात इमोजी ऍड करता येत होते. आणि तसे न केल्यास Hey there, I am using WhatsApp. असे स्टेटस डिफॉल्ट पद्धतीने आपल्या अकाउंटवर दिसायचे. पण या नव्या स्टेटस फिचरमुळे टेक्स्टच्या जागी तुम्ही तुमचा एखादा छोटासा व्हिडिओही पोस्ट करू शकता. एखादा फोटो खास मेसेजसह शेअर करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या स्टेटसवर तुमची मित्रमंडळी कमेण्ट्सही करू शकतील. चॅटमधून तुम्हाला त्या कमेण्ट्स मिळतील. तुमचा मित्र कोणत्या अपडेटवर रिप्लाय देतोय, हे देखील तुम्ही आता पाहू शकता.
स्टेटस अपडेट करण्यासाठी आत खास मेन्यूमध्ये आतही जावे लागणार नाही. चॅट आणि कॉल्स ऑप्शनच्या मध्येच त्यासाठी स्पेशल टॅब मिळेल. डिफॉल्ट सेटिंग्सच्या माध्यमातून आता सर्व कॉन्टॅक्ट्स स्टेटस अपडेट पाहू शकतील. आपल्याला हवे असल्यास सेंटिग बदलता येऊ शकते. आपले स्टेटस कोणी पाहावे आणि कोणी नाही, हेही आपण सेटिंगमध्ये जाऊन निवडू शकाता, ही सुविधा देण्यात आली आहे.