Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू

पॉवर बँकमुळे युवतीचा मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बँकची गरज निकड झाले आहे. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरले आहे.
 
एका नायझेरियन मुलीने मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा वापर केला. त्याचवेळी तिने आपला मोबाईल आणि पॉवर बँक खांद्यावर ठेवून ती झोपी गेली. त्याचवेळी तिची एक चूक झाली. पॉवर बँक रिचार्ज करण्यासाठी तिने लावला होता. मात्र यावेळी पॉवर बँक ओव्हरहीट झाला. त्यामुळे या तरुणीची स्किन जळाली आणि त्यानंतर तिला विजेचा शॉक लागला. यात तिचा मृत्यू झाला. ज्यावेळी या तरुणीचे आई-वडील तिच्या रुममध्ये आले. त्यावळी त्यांना हा प्रकार लक्षात आला. तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मांसाहारस बंदीची पेटाची मागणी आयआयटी मुंबईने फेटाळली