Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या सरकारी नऊ बँका बंद होणार, कोट्यवधी पैसे बुडणार ! नेमके खरे काय ?

या सरकारी नऊ बँका बंद होणार, कोट्यवधी पैसे बुडणार ! नेमके खरे काय ?
सोशल मीडिया हा नवीन मीडिया कधी फायदा तर अनेकदा डोकेदुखीचे कारण ठरतो. फायद्या पेक्षा अधिक डोकेदुखीच समोर आली आहे. आता सर्वत्र असा मेसेज पसरतोय की नऊ मोठ्या बँका बंद होणार आहेत. त्यामुळे सरकारला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.काही दिवसांपासून नऊ सरकारी बँका बंद  होणार असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर प्रचंड  व्हायरल होत आहे. मात्र हा मेसेज केवळ अफवा असून बँकांमधील (Public sector banks) ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहेत आणि राहतील त्यांना काहीही होणार नाही असे  स्पष्टीकरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे.  सरकारी बँकांमध्ये भांडवल निर्मिती करुन बँका मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं वित्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
 
सोशल मीडियावर व्हायरल मेसेजमध्ये नऊ सरकारी बँका बंद होणार असल्याचा दावा केला जातोय. या मेसेजमध्ये कॉर्पोरेशन बँक, IDBI बँक, यूको बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, इंडियन ओवसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँकेच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून न जाता सोशल मीडिया मेसेजवर विचारपूर्वक विश्वास ठेवावा कोणतीही बँक बंद होणार नसल्याने कोणताही आर्थिक धोका नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांवरील कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही: मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण