नवा लॅपटॉप घेताय?

गुरूवार, 25 ऑक्टोबर 2018 (00:54 IST)
आपल्याला नवा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर अनेक प्रश्न आपल्या डोक्यात फेर धरू लागतात. त्यात अनेक प्रकारच्या जाहिरातींचा भडीमारही आपल्यावर विविध माध्यामांतून होत असतो. त्यामुळे आपल्या गोंधळात भरच पडते. या पार्श्वभूमीवर, आपल्याला काही मूलभूत गोष्टींची माहिती असली, तर निर्णय घेणे सोपे जाते. म्हणूनच त्या संदर्भातील या काही महत्त्वपूर्ण टिप्स.
 
लॅपटॉपचे वजन कमीत कमी असावे
 
लॅपटॉपची बॅटरी कमीत कमी चार सेलची असावी. ती 'लिथियम टाइप'ची असली, तर अधिक चांगले. काही लॅपटॉपमध्ये सहा सेलचीही बॅटरी असते. कमीत कमी तीन तास बॅटरी बॅकअप असलेला लॅपटॉप निवडावा.
 
लॅपटॉप किंवा डेस्कटॉप काहीही घ्यायचे असेल, तरी प्रोसेसर लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा आणि लेटेस्ट जनरेशनचा असावा. उदाहरणार्थ, सध्या 'इंटेल कोअर आय फाइव्ह'चे पाचवे जनरेशन आणि 'इंटेल कोअर आय सेव्हन'चे सातवे जनरेशन चालू आहे. 'प्रोसेसर'ची कॅशे मेमरी कमीत कमी तीन एमबी असावी.
 
'ग्राफिक्स'शी संबंधित काम असेल, तर स्वतंत्र ग्राफिक्स कार्ड असलेला लॅपटॉप घ्यावा. त्याकमध्ये किमान एक जीबी ग्राफिक्स मेमरी असावी. व्हिडिओ गेम खेळण्यासाठीही ग्राफिक्स कार्ड असलेला लॅपटॉप असल्यास उत्तम.
 
'हार्ड डिस्क'ची क्षमता किमान 500 जीबी असावी
 
लॅपटॉपचा डिस्प्ले शक्यतो एलईडी प्रकारचा घ्यावा आणि त्याचा आकार गरजेनुसार निवडावा. 14 इंची, 15 इंची आणि 17 इंची आकाराच्या स्क्रीनचे लॅपटॉप उपलब्ध असतात. 14 इंची स्क्रीन असेल, तर बॅटरी बॅकअप जास्त मिळतो. 17 इंची स्क्रीनच्या 'लॅपटॉप'ला बॅटरी बॅकअप कमी मिळतो आणि त्याचे वजनही वाढते.
 
लॅपटॉपची वॉरंटी कमीत कमी एक वर्षाची असावी. ती जर अपघात नुकसानभरपाई देणारी असेल, तर खूपच चांगले. काही कंपन्या वॉरंटी तीन वर्षांपर्यंत वाढवून देण्याची ऑफर देतात. तशी संधी मिळाली, तर जरूर फायदा घ्यावा.
 
लॅपटॉपमध्ये 'यूएसबी'चे 3.0 व्हर्जन सध्या बाजारपेठेमध्ये आहे. अर्थातच लेटेस्ट व्हर्जन अधिक उपयुक्त ठरते.
 
इंटर्नल माइक असलेला लॅपटॉप घ्यावा. तो नसेल, तर व्हिडिओ चॅटिंग करण्यासाठी हेडफोनचा वापर करावा लागतो.
 
लॅपटॉपमधील इन-बिल्ट कॅमेरा 'एचडी क्वॉलिटी'चा असेल तर उत्तम.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती

LOADING