Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 18 March 2025
webdunia

Redmi चे नवीन वायर्ड इयरफोन्स, इतके स्वस्त की किंमत जाणून व्हाल हैराण

Redmi चे नवीन वायर्ड इयरफोन्स, इतके स्वस्त की किंमत जाणून व्हाल हैराण
, गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (13:35 IST)
आपण स्वस्त इयरफोन शोधत असाल तर रेडमी इंडियाने मात्र 399 रुपयात आपल्यासाठी इयरफोन लाँच केले आहे. हे रेडमीने आपल्या नव्या फोन रेडमी 9ए सोबत लॉन्च केले आहे. इयरफोनला एल्युमिनियम एलॉय बॉडी आणि शानदार डिजाइन देण्यात आली आहे. 
 
क्लासिक पेक्षा वेगळे नवीन इयरबड्समध्ये पॅसिव्ह कॅन्सलेशनसाठी सिलिकॉन टिप्स देण्यात आली आहे. इयरफोन्स रेड, ब्लॅक आणि ब्लू कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री अमेजन, फ्लिपकार्ट आणि एमआयच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर 7 सप्टेंबर पासून उपलब्ध असणार.
 
इयरफोन्सच्या दमदार ऑडियोसाठी 10mm ड्राइवर्सचा वापर करण्यात आला आहे. हे इयरफोन्स मॅटेलिक बॉडी आणि लाइट वेट मध्ये येतील. किंमत कंपनी रियरलमी बड्स क्लासिकच्या किंमती इतकी ठेवण्याची शक्यता आहे. 14.2mm च्या रियलमी बड्स क्लासिकची किंमत 399 रुपये आहे. कंपनीने क्रिस्टल क्लिअर आवाज आणि डायनेमिक बास आणि री-डिफाइन टेरिबल मिळण्याचा दावा केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदित्य ठाकरेंची ड्रग टेस्ट करा : नीलेश राणे