Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 मिलियन

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 मिलियन
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस जिओने हे यश 2 मार्च रोजी प्राप्त केले.
 
जिओने या मोठ्या यशाची घोषणा आयपीएल सीझन दरम्यान टीव्ही जाहिरातीत केले. जिओ ‘300 मिलियन यूजर्सचा उत्सव’ साजरा करत असल्याचे जाहिरातीत दर्शवण्यात आले. जिओ 170 दिवसात 100 मिलियन टेलिकॉम ग्राहकांना प्राप्त करणारी दुनियेतील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
 
डिसेंबर 2018 ला समाप्त तिमाहीसाठी आपल्या उत्पन्न अहवालात भारती एअरटेलने जाहीर केले की त्यांचे 284 मिलियन ग्राहक होते.
 
नियामक फाइलिंगप्रमाणे भारती एअरटेलने डिसेंबरमध्ये आपल्या नेटवर्कवर 340.2 मिलियन ग्राहक आणि जानेवारी शेवटी 340.3 मिलियन ग्राहक असल्याची सूचना दिली.
 
भारती एअरटेलने आपल्या ऑपरेशनच्या 19 व्या वर्षात 300 मिलियन ग्राहकांचा आकडा पार केला आहे. 31 ऑगस्ट 2018 ला व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरचे मोबाइल व्यवसायातील विलिनीकरणानंतर 400 मिलियन ग्राहकांसह व्होडाफोन आयडिया देशभरातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा फायदा