Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जियो'शी निगडित मोठी बातमी, आता नाही मिळणार हा फायदा

'जियो'शी निगडित मोठी बातमी, आता नाही मिळणार हा फायदा
नवी दिल्ली , गुरूवार, 6 एप्रिल 2017 (22:38 IST)
मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेले रिलायंस जियोचे तीन महिने नि:शुल्क असणारे 'समर सरप्राइज' ऑफरवर दूरसंचार नियामकाचे प्रतिबंध लावल्यानंतर जियोने याला परत घेण्याची घोषणा केली आहे. पण त्यांनी हे ही स्पष्ट केले आहे की परत घेण्या अगोदर यासाठी प्राइम मेंबर बनलेले ग्राहकांना याचा फायदा समर सरप्राइजचा लाभ मिळत राहील.  
 
यासोबतच समर सरप्राइज ऑफरदेखील मागे घेण्यास सांगितलं आहे. जिओकडून ट्रायच्या या आदेशाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.  पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार ज्या ग्राहकांनी आधीच या ऑफरसाठी नोंदणी केली आहे त्यांना याचा फटका बसणार नाही. 
 
हॅप्पी न्यू इयर ऑफर संपेपर्यंत अपेक्षेएवढ्या ग्राहकांनी प्राइम मेंबरशिपसाठी नोंदणी न केल्याने जिओने प्राइम मेंबरशिपसाठी 15 दिवसांची मुदत वाढवली होती. जिओकडून सर्व ग्राहकांना दररोज 1 GB मोफत डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देण्यात आली होती. 31 मार्च 2017 ही या ऑफरची अंतिम तारीख होती. मात्र, रिलायन्सने पुन्हा ही तारीख 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली.तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती.  तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना 15 एप्रिलपूर्वी प्राईम मेंबरशिप घेणं गरजेचं करण्यात आलं होतं. पण आता ट्रायच्या आदेशाने जिओला दणका बसला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदीना उत्तम चित्र देत मतदारसंघासाठी मागितले पाणी