शॉपिंगसाठी आलं जिओफोन गिफ्ट कार्ड

सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (16:03 IST)
आता रिलायंस जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. ही दिवाळी अजून खास बनावी यासाठी हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात. जिओफोन गिफ्ट कार्ड असं या कार्डचं नाव आहे. 1095 रुपये इतकी या कार्डची किंमत आहे, रिलायंस डिजिटल स्टोअर्स किंवा अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुनही हे कार्ड खरेदी करता येऊ शकतं. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे. पण, जिओ फोन खरेदी करण्यासाठी या कार्डचा मुख्य फायदा होईल. 
 
रिलायंस जिओकडून हे गिफ्ट कार्ड Monsoon Hungamaऑफरअंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या कार्डद्वारे युजर कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन अगदी मोफत खरेदी करु शकतात. यापूर्वी यासाठी ग्राहकांना 501 रुपये खर्चावे लागत होते. तसंच या गिफ्ट कार्डसोबत 594 रुपयांचं स्पेशल रिचार्ज देखील मिळेल. या स्पेशल रिचार्जची वैधता सहा महिन्यांसाठी असेल, तसंच अमर्यादित लोकल, रोमिंग आणि नॅशनल कॉलिंगची सेवा याद्वारे मिळेल. दरदिवशी 500 एमबी हाय-स्पीड 4जी डेटा, म्हणजेच युजरचा एकूण 90 जीबी डेटाचा फायदा आहे. एक्सचेंज बोनस अंतर्गत युजरला 6 जीबी जास्त डेटा मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल