नवं सिमकार्ड घेण्यासाठीच्या नियमांमध्ये केंद्र सरकारनं बदल केला असून काही नियम अधिक कडक केले आहेत. यापुढे एखादा नंबर प्रिपेडवरून पोस्टपेड करायचा असेल किंवा पोस्टपेडवरून प्रिपेड करायचा असेल, तर कागदी फॉर्म भरण्याची गरज नसेल. एक डिजिटल फॉर्म भरून ग्राहक हे काम जलद करू शकणार आहेत.
नव्या नियमांनुसार जर एखाद्या नागरिकाला नवं सिमकार्ड विकत घ्यायचं असेल, तर आता कुठल्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. प्रत्येक नागरिकाचा डिजिटल केवायसी हाच त्यासाठी गृहित धरला जाणार आहे.
प्रत्येक टेलिकॉम कंपनीच्या ऍपवर यासाठीचा पर्याय उपलब्ध असेल. त्यावर जाऊन ग्राहकांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी नागरिकांना केवळ 1 रुपया शुल्क भरावं लागेल.