Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसबीआय क्विक अॅप सुरु

एसबीआय क्विक अॅप सुरु
, शनिवार, 17 मार्च 2018 (15:42 IST)

स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या कंट्रोलिंगसाठी विशेष फीचर्स देण्यात आलेय. या अॅपबद्दल माहिती देण्यासाठी एसबीआयने ट्विटर हँडलवरुन ट्वीटही केलेय. एसबीआय क्विक ही मिस कॉल आणि एसएमएस बँकिंग सुविधा आहे. या अॅपद्वारे एटीएम कार्ड ब्लॉक करणे तसेच ऑन वा ऑफ करणे तसेच एटीएम पिन जनरेट करणे यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यात. यासाठी मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असायला हवा. त्यानंतर मोबाईल नंबरवर हे अॅप डाऊनलोड करु शकता. 

हे अॅप सुरु करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी अॅपच्या रजिस्ट्रेशन फीचरमध्ये जाऊन ज्या नंबरवर अॅप डाऊनलोड केलंय तो नंबर एंटर करा आणि नंतर रजिस्ट्रेशन करा. जर एटीएम कार्ड हरवलेय आणि ते ब्लॉक करायचेय तर या अॅपमधील 'ATM कम डेबिट कार्ड' फीचरमध्ये जाऊन 'ATM कार्ड ब्‍लॉकिंग' सिलेक्ट करा. त्यानंतर  कार्डवरील अखेरचे ४ डिजीट एंटर करुन कंटीन्यूवर सिलेक्ट करा. या सर्व्हिससाठी चार्ज द्यावे लागेल. या अॅपद्वारेएटीएम कार्डला स्विच ऑन वा ऑफ करु शकता. यासा एटीएम कम डेबिट कार्ड फीचरमध्ये जाऊन  कार्डवरील अखेरचे ४ डिजीट टाकून एटीएम कार्ड स्विच ऑन/ऑफ वर क्लिक करा. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दमदार फीचर्ससह होंडा अॅक्टिव्हा 5G,जाणून घ्या किंमत