Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर

गुगलची अॅपल फोन वापरणाऱ्यांवरही नजर
, मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (16:17 IST)
गुगल केवळ अँड्रॉइड वापरकर्त्यांवरच लक्ष ठेऊन नाहीय, तर अॅपलचे फोन वापरणाऱ्यांवरही नजर ठेवत आहे. आयओएस वापरकर्त्यांना गुगल काही अॅप वापरायला देते. याद्वारे मोबाईलची लोकेशनची अंतर्गत सेटिंग बंद जरी केलेली असली तरीही गुगल या अॅपद्वारे मोबाईलचे लोकेशन ट्रॅक करते. याबाबत प्रिंसटन यूनिवर्सिटीमधील संशोधकांनीही दुजोरा दिला आहे. 
 
अशा प्रकारे मोबाईल वापरकर्त्यावर लक्ष ठेवणे म्हणजे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर घाला घालण्यासारखे आहे. यावर लोकेशन बंद ठेवले असल्यास तुम्ही कुठे जात असता याबाबतची माहिती गुगल साठवत नाही. मात्र, लोकेशन बंद केल्यानंतर काही अॅपद्वारे लोकेशन डेटा सुरक्षित ठेवू शकता, या माहितीचा वापर अन्य सुविधा देण्यासाठी होतो, असे गुगलने सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खबरदारीचा उपाय, कॉसमॉसचे एटीएम दोन दिवस बंद