Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता इंटरनेटशिवायही पाठवता येईल Location, जाणून घ्या कसं शक्य आहे

आता इंटरनेटशिवायही पाठवता येईल Location, जाणून घ्या कसं शक्य आहे
, शनिवार, 13 मार्च 2021 (11:11 IST)
कुठलाही आपला पत्ता समजावून सांगण्यासाठी सोपं म्हणजे लोकेशन पाठवणे. पण लोकेशन पाठवाण्यासाठी इंटरनेटची गरज असते. इंटरनेट नसेल तर लोकशन पाठवणे आता शक्य झाले आहे. याची प्रक्रिया जाणून घ्या
 
स्मार्टफोनवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना Google Maps उघडा.
नंतर आपण कुठे आहोत हे शोधा. 
गुगल मॅप्सवर तुमचं लोकेशन सापडलं की त्यावर काही वेळ टच करून ठेवा. 
त्या लोकेशनवर रेड डॉट तयार होईल.
स्क्रीनवर खालच्या बाजूला तीन पर्याय दिसतील. 
पहिला डायरेक्शन, दुसरा शेअर आणि तिसरा सेव्ह. 
आवश्यकतेनुसार योग्य पर्याय निवडावा.
 
SMS द्वारे लोकेशन पाठवा
SMS द्वारे लोकेशन पाठवण्यासाठी RCS अर्थात रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस माध्यमातून दुसऱ्या युझरला मल्टिमीडिया कंटेंट, लोकेशन पाठवू शकता. त्यासाठी इंटरनेटची गरज नाही.
 
WhatsApp द्वारे लोकेशन पाठवणं
हे खूप सोपे आहे.
सगळ्यात आधी व्हॉट्सअॅप उघडून चॅट पर्याय वर जा.
ज्याला लोकेशन पाठवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव सिलेक्ट करा.
चॅट विंडो उघडा.
खाली अटॅचमेंट आयकॉन वर क्लिक करा.
लोकेशन पर्याय निवडा. 
त्यात Send Your Current Location आणि Share Live Location असे दोन पर्याय दिसतील. 
त्यातील आपल्याला हवा असलेला पर्याय निवडा आणि पाठवून द्या.
 
यात व्हॉट्सअॅप द्वारे लोकेशन पाठवताना Current Location आणि Live Location असे दोन प्रकार असतात. करंट लोकेशन म्हणजे ते शेअर करताना तुम्ही ज्या ठिकाणी असाल, ते ठिकाण व लाइव्ह लोकेशन म्हणजे तुम्ही शेअर केलेलं लोकेशन तुम्ही जसजसे मूव्ह कराल बदलतं. यात लोकेशन आपण फिरत असाल त्याप्रमाणे अपडेट होत राहते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19: कोरोनाची नवीन लक्षणे भयानक आहेत! आतड्यांमधील अडथळा, पोटदुखी आणि अतिसार देखील रुग्णांना त्रास देत आहे