नांदेडमधील भोकर येथे‘रेड मी’मोबाईलमधून धूर आला. आणि काही क्षणात मोबाईलचा कोळसा झाला. मात्र बाईल वॉरंटीत असताना कंपनीने हात वर केले असून ग्राहकांने ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. रहिवासी प्रा. मीरा जोशी यांनी रेड मी वाय १, मॉडेलचा बॅटरी इनबिल्ट असलेला मोबाईल खरेदी केला. मात्र, नव्या मोबाईल चालू करताच मोबाईलमधून धूर येण्यास सुरुवात झाली.
या प्रकाराबाबत मोबाईलची वॉरंटी असल्याने दुकानदाराशी संपर्क केला. नांदेड येथील कंपनीच्या केअर सेंटरकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार केअर सेंटरला भेट दिली असता सुरुवातीला कंपनीला कळवून मार्ग काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे वेळोवेळी भेट घेतली असता मात्र बर्न केस आम्ही घेत नाहीत. तुम्ही कंपनीशी डायरेक्ट संपर्क करा, असे सांगत टाळण्यास केली. कंपनीकडे याबाबत तक्रार केली असता मोबाईलमधील बॅटरी उघडण्याचा प्रयत्न केला गेल्याने हा प्रकार घडल्याचे कारण सांगून हात वर केले आहेत.