भारत आणि स्पेनसारख्या गरिब देशांमध्ये कंपनी स्नॅप चॅटला विस्तार करण्यात रस नाही, या अर्थाचे वक्तव्य त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले.
ही गोष्ट कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने उघड केल्याने सध्या भारतासह अनेक ठिकाणी सोशल मीडियावर संताप व्यक्त होतोय.
पण या सर्वांमध्ये एक गैरसमज झाल्याने स्नॅप चॅट ऐवजी स्नॅप डिल ला त्याचा फटका बसतोय.
अनेकांनी स्नॅप डील च्या जाऊन निषेध नोंदविण्यास सुरूवात केली आहे.
या दोन्ही कंपन्या एकच आहे, असे त्यांना वाटले. पण त्यानंतर काही जणांनी ट्विट करून या दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत असे सांगितले. पण तो पर्यंत उशिर झाला आहे.
सोशल मीडियाच्या प्रसाराचा फटका चांगल्या चांगल्यांना कसा बसू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहेत.