मल्टिमीडिया मेसेजिंग एप स्नॅपचॅटमध्ये लवकरच नवीन फीचर बघायला मिळणार आहे, ज्यात एक स्टिकरच्या मदतीने प्रायवेट ग्रुप चॅटिंगचा भाग बनेल. या फीचरची माहिती जैन मैन्चुन वोंग यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे दिली आहे. पोस्टामध्ये सांगण्यात आले आहे की स्नॅपचॅट ग्रुप चॅट स्टिकर तयार करत आहे. तसेच यात सांगण्यात आले आहे की इंस्टाग्राम देखील या प्रकारचा फीचर तयार करत आहे, ज्याची माहिती मागच्या महिन्यात देण्यात आली होती आता बघायचे आहे की दोघांपैकी कोण हा फीचर आधी लाँच करेल.