Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लवकरच भारतात स्टारलिंक इंटरनेट सुरू होणार,एअरटेल आणि स्पेसएक्सने केली भागीदारी

airtel
, मंगळवार, 11 मार्च 2025 (20:38 IST)
एअरटेलने स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट भारतात आणण्यासाठी एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्ससोबत करार केला आहे , जरी हा करार तेव्हाच लागू केला जाईल जेव्हा स्पेसएक्सला स्टारलिंक सेवा विकण्यासाठी भारत सरकारकडून परवानगी मिळेल.
 एलोन मस्कची कंपनी स्टारलिंक बऱ्याच काळापासून भारतात येण्याची तयारी करत आहे. आता स्टारलिंकने भारतीय कंपनी एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. या अंतर्गत भारतात स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सुरु केले जाणार. 
स्टारलिंक भारतात आल्यावर स्टारलिंक उपकरणे एअरटेलद्वारे विक्री केली जाऊ शकतात. या भागीदारीचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे. स्टेरलिंकला भारतात विस्तार करणे सोपे जाईल. विद्यमान पायाभूत सुविधांचा स्टारलिंकला फायदा होईल. 
एअरटेल आधीच युटेलसॅट वनवेबच्या सहकार्याने उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करत आहे. स्टारलिंकच्या समावेशामुळे दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेज वाढेल आणि व्यवसाय आणि ग्रामीण समुदायांना हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरमनप्रीत कौरने नवा इतिहास रचत विक्रम केला