Publish Date: Mon, 06 Jul 2020 (08:00 IST)
Updated Date: Mon, 06 Jul 2020 (08:05 IST)
जिओ टीव्हीवर बारावी विज्ञान आणि दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी ‘जिओ ज्ञानगंगा’ या तीन वाहिन्यांचे रविवारी उद्घाटन करण्यात आले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर जिओ सावन या रेडिओ चॅनेलवर ‘वुई लर्न इंग्लिश’ या कार्यक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले.
शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपाय योजण्यात येत आहेत. जिओ टीव्हीवरील तीन वाहिन्यांवर रोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण केले जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
येत्या काळात अजून ९ वाहिन्या सुरू केल्या जाणार आहेत. दहावी उर्दू माध्यम, नववी, आठवी, सातवी, सहावी, तिसरी आणि चौथी या इयत्तांसाठी इंग्रजी, उर्दू आणि मराठी माध्यमातील वाहिन्या सुरू करण्यात येणार आहेत.