Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिलायंस जियो नंबरचे बँलेंस असे चेक करा

रिलायंस जियो नंबरचे बँलेंस असे चेक करा
1 एप्रिलपासून तुम्हाला रिलायंस जियोच्या सेवेसाठी भुगतान करावे लागणार आहे. शक्य आहे की तुमच्यातून बर्‍याच लोकांनी आतापर्यंत प्रीपेड रिचार्ज करवले असेल. 1 एप्रिलनंतर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुमचे बँलेंस किती आहे. आता जेव्हा  रिलायंस जियोवर सर्व वॉयस कॉल फोकट आहे, तेव्हा बँलेंसचा वापर तुमच्याकडून निवडण्यात आलेल्या डेटा प्लानच्या भुगतानसाठी होईल. किंवा जास्त डेटा खपतीसाठी.  
 
मग तुम्ही जियो प्राइम यूजर असो किंवा नसो, बँलेंस जाणून घेणे फारच आवश्यक आहे. जियो वेबसाइटप्रमाणे, तुम्ही दोन पद्धतीने बँलेंस चेक करू शकता. हो पण त्यासाठी इंटरनेटची गरज पडणार आहे. आम्ही दोन्ही माध्यमांची टेस्टिंग केली आणि असे आढळले की हे फारच कारगर आहे. तुम्ही या प्रकारे बँलेंसची चाचणी करू शकता.  
 
फोन वर  
फोनवरून बँलेंसची चाचणी करणे फारच सोपे आहे. हे करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटही लागणार नाही.  
 
1. तुम्ही आपल्या जियो कनेक्टेड फोनमध्ये माय जियो ऐप लाँच करा.  
2. त्यानंतर माय जियोसमोर दिसत असलेले ओपनवर टॅप करा.  
3. नंतर Sign In** वर टॅप करा. तुम्हाला तुमचे यूजर नेम (फोन नंबर) आणि पासवर्ड द्यावा लागेल, किंवा तुम्ही साइन इन विथ सिमची निवड करू शकता.  
4. तुम्ही वर डावीकडे दिसत असलेले तीन लाइनला क्लिक करू शकता.  
त्यानंतर माय प्लान्स वर टॅप करा.  
5. बस झाले. आता तुम्हाला या स्क्रीनवर डेटाचे बँलेंस आणि वैधता दिसून येईल.  
 
या स्क्रीनवर प्रीपेड डेटा, वाय-फाय डेटा, एसएमएस आणि कॉलचे संपूर्ण विवरण राहील.  
 
कॉम्प्युटर वर   
तुम्ही जियो फोनमध्ये बँलेस चेक नाही करू शकत असाल कारण तुमचा डेटा काम करत नसेल आणि तुम्हाला बँलेंस चेक करायचे असेल तर दुसरी पद्धत फारच सोपी आहे.  
 
1. जियो डॉट कॉमवर जा.  
2. आपल्या फोन नंबर आणि पासवर्डने साइनइन करा.  
3. त्यानंतर माय प्लान्सवर क्लिक करा. आपले बँलेंस आणि इतर विवरण चेक करा.  
 
तर या प्रकारे तुम्ही तुमचे बँलेंस चेक करू शकता. काही वेबसाइट्सने दावा केला आहे की जियो यूजर MBAL लिहून 55333वर  एसएमएस करून किंवा *333# वर डायल करून बँलेंस चेक करू शकता. आम्ही दोन्ही पद्धतींचा वापर केला पण अद्याप यात ते यशस्वी झाले नाही आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

200 किलो वजनाची मॉडेल आणि कमाई लाखोंची