Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

व्हॉट्सअॅपवर टायपिंगच्या चुका दुरुस्त करण्यासाठी येणार एडिट बटण

व्हॉट्सअॅपवर टायपिंगच्या चुका दुरुस्त करण्यासाठी येणार एडिट बटण
, शुक्रवार, 3 जून 2022 (23:03 IST)
व्हॉट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्सची चाचणी घेत असते. इन्स्टंट मेसेजिंग अॅपच्या आगामी फीचर्सच्या यादीत आता आणखी एका नवीन फीचरचे नाव जोडले गेले आहे. हे आहे 'एडिट'.
 
व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या यूजर्सना नवीन मेसेजिंग फीचर म्हणून 'एडिट' पर्याय देणार आहे. हे बटण वापरकर्त्यांना चुकीचा आणि टायपोसह पाठवलेला संदेश सुधारण्यास मदत करेल.
 
व्हॉट्सअॅप लवकरच आपल्या यूजर्सना नवीन मेसेजिंग फीचर म्हणून 'एडिट' पर्याय देणार आहे. रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध आहे. तथापि, भविष्यातील अपडेटसह, ते iOS आणि डेस्कटॉप वापरकर्त्यांना देखील ऑफर केले जाईल. 

हे बटण वापरकर्त्यांना चुकीचा आणि टायपोसह पाठवलेला संदेश सुधारण्यास मदत करेल. सध्या या वर काम सुरु आहे. हे अद्याप बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. परंतु अशी अपेक्षा आहे की हे वैशिष्टये भविष्यात अपडेट केल्यावर प्रत्येकासाठी आणले जाईल. 

माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटर वर या EDIT बटणाची आतुरतेने वाट बघत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या फीचरवर काम करत आहे. हे फीचर्स ट्विटर ब्लु युजर्स साठी आणले जाईल. त्यानंतर हे एडिट बटण फीचर्स इतर युजर्ससाठी रोलआउट केले जाईल. कंपनी ने 6 एप्रिल रोजी ट्विट करून या एडिट बटण फीचर्स येण्याचे जाहीर केले होते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई मधील रिक्षा-टॅक्सीच्या दरामध्ये होणार भाडेवाढ?