Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘ही’चिनी अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक,वाचा संपूर्ण यादी

‘ही’चिनी अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक,वाचा संपूर्ण यादी
, गुरूवार, 18 जून 2020 (15:06 IST)
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला आहे. भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स (ban china app)वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिली आहे. 
 
ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं आहे. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टीक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा (ban china app)  समावेश आहे.
 
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेल्या या यादीला आणि या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयाने पाठिंबा दर्शवला आहे. ही अ‍ॅप्स भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे सरकारला कळवण्यात आल्याचं, एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
 
“यंत्रणांनी दिलेल्या सल्ल्यावर सध्या चर्चा सुरु आहे,”असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. प्रत्येक अ‍ॅपशी संबंधित धोके आणि त्याचा धोक्यांचा अंदाज कसा बांधता येईल यासंदर्भात सविस्तर माहिती सरकारला देण्यासंदर्भात काम सुरु असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
 
परदेशामध्ये बंदी घालण्यात आलेल्या काही व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्ससंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने एप्रिलमध्येच इशारा जारी केला होता. राष्ट्रीय सायबर सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्यानंतर हा इशारा जारी करण्यात आला होता. वापरकर्त्यांच्या म्हणजेच युझर्सच्या सुरक्षेसंदर्भात गांभीर्याने विचार न करणाऱ्या मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यासंदर्भातील मागणी वेळोवेळी केली जाते. 
 
मात्र हे असे आरोप कंपन्यांकडून फेटाळले जातात. चीनमधील बाइट डान्स या कंपनीच्या मालकीच्या टीक-टॉक अ‍ॅपवर मागील काही काळामध्ये माहिती मिळवण्यासंदर्भातील आरोपांबरोबर युझर्सच्या खासगी माहितीबद्दल ठोस धोरण नसल्याचे आरोप करण्यात आले. मात्र कंपनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
कंपन्यांकडून आरोप फेटाळण्यात येत असले तरी चिनी कंपन्यांशी संबंधित अ‍ॅण्ड्रॉइड तसेच आयओएस अ‍ॅप्स धोकादायक असल्याचे सांगण्यात येते. चिनी कंपन्यांनी बनवलेले किंवा चीनमधील कंपन्यांच्या मदतीने बाजारामध्ये दाखल झालेले अ‍ॅप्स हे हेरगिरी तसेच मालवेअर पसरवण्यासाठी वापरले जाण्याची शक्यता अनेकदा व्यक्त कऱण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांसंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींने हे अ‍ॅप्स वापरु नयेत अशा संदर्भातील सूचनाही करण्यात आल्याच्या बातम्याही मागील काही काळापासून सातत्याने समोर येत आहेत. माहिती सुरक्षित राहण्यासंदर्भात साशंकता निर्माण होत असल्याने असे अ‍ॅप्स वापरु नये असं सांगण्यात आलं होतं.
पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.
ही पाहा अ‍ॅप्सची यादी
TikTok
Vault-Hide
Vigo Video
Bigo Live
Weibo
WeChat
SHAREit
UC News
UC Browser
BeautyPlus
Xender
ClubFactory
Helo
LIKE
Kwai
ROMWE
SHEIN
Zoom
NewsDog
Photo Wonder
APUS Browser
VivaVideo- QU Video Inc
Perfect Corp
CM Browser
Virus Cleaner (Hi Security Lab)
Mi Community
DU recorder
YouCam Makeup
Mi Store
360 Security
DU Battery Saver
DU Browser
DU Cleaner
DU Privacy
Clean Master – Cheetah
CacheClear DU apps studio
Baidu Translate
Baidu Map
Wonder Camera
ES File Explorer
QQ International
QQ Launcher
QQ Security Centre
QQ Player
QQ Music
QQ Mail
QQ NewsFeed
WeSync
SelfieCity
Clash of Kings
Mail Master
Mi Video call-Xiaomi
Parallel Space

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day Gift: हे कमी किंमतींचे स्मार्टफोन आपल्या वडिलांना भेटवस्तू म्हणून देऊ शकतात