rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp :व्हॉट्सअॅपची ही मोफत सेवा बंद होणार!

WhatsApp users
, मंगळवार, 9 जानेवारी 2024 (14:52 IST)
व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या वर्षापासून, वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असलेली मोफत सेवा संपुष्टात येऊ शकते. गुगलने यापूर्वीच याबाबतचे संकेत दिले आहेत.व्हॉट्सअॅप वरील बहुतेक वापरकर्ते त्यांच्या चॅटचा बॅकअप क्लाउड स्टोरेजवर सेव्ह करतात, जे पूर्णपणे मोफत आहे. आता या वर्षापासून ही सेवा मोफत मिळणार नाही.
 
व्हॉट्सअॅप हे संपूर्ण जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. या अॅपवर दररोज करोडो यूजर्स एकमेकांना मेसेज करतात. बरेच वापरकर्ते त्यांचे चॅट, फोटो आणि व्हिडिओ गुगल वर बॅकअप म्हणून विनामूल्य ठेवतात. आता ही बॅकअप सेवा फार काळ मोफत राहणार नाही. यासाठी वापरकर्त्यांना शुल्क भरावे लागणार. युजर्स आता गुगल ड्राइव्ह वर अमर्यादित चॅट विनामूल्य सेव्ह करू शकणार नाही.
 
युजर्सला क्लाउड स्टोरेजसाठी पैसे मोजावे लागणार.किंवा डेटा काढावा लागणार. या साठीव्हॉट्सअॅपने तयारी केली आहे. सध्या युजर्सला  गुगल ड्राइव्हर विनामूल्य15 GB क्लाउड डेटा मिळत आहे. या साठी हा नियम बदलणार आहे. मात्र अद्याप तारीख जाहीर झालेली नाही.  
 
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला CEO ने गोव्यातील एका हॉटेलमध्ये 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली, मृतदेह बॅगेत घेऊन पळाली