Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुगलचा पायरसीविरोधातील लढा तीव्र, टॉरंट वेबसाईटवर बंदी

गुगलचा पायरसीविरोधातील लढा तीव्र, टॉरंट वेबसाईटवर बंदी
, मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (17:08 IST)
गुगलने पायरसीविरोधातील लढा अधिक तीव्र करत टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. टॉरंटफ्रीकने दिलेल्या वृत्तानुसार पायरसीला प्रोत्साहन दिलं जात असल्याने हॉलिवूडमधील प्रतिनिधींकडून गुगलवर टीका होत होती. त्यामुळेच गुगलने हॉलिवूडमध्ये चालणाऱ्या पायरसीवर निशाणा साधत टॉरंट वेबसाईटवर बंदीचा निर्णय घेतला आहे. टॉरंट बेवबसाईट्सचा सामना करण्यासाठी फक्त गुगलनेच पुढाकार घेतला नसून गूगलसोबतच बिंग, याहू, यासारख्या सर्च इंजिनकडूनही टॉरंट वेबसाईटवर बंदी घालण्यात येणार आहे. ब्रिटनमध्ये नुकतीच यासंबंधी बैठक पार पडली. बैठकीत गुगल, याहू, बिंग आणि हॉलिवूडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. सध्या फक्त ब्रिटनमध्येच गुगल कारवाई करत टॉरंट वेबसाईट्स आणि सर्व्हरवर बंदी घालणार आहे. त्यानंतर हळू हळू जगभरात ही कारवाई करण्यास सुरुवात होईल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धिविनायकाच्या पूजेच्या ताटात श्रीफळ नाही