Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीस जानेवारीपासून एअरसेलची ६ सर्कलमधली सेवा बंद

तीस जानेवारीपासून एअरसेलची ६ सर्कलमधली  सेवा बंद
, शुक्रवार, 22 डिसेंबर 2017 (10:00 IST)

टेलिकॉम कंपनी एअरसेलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षात तीस जानेवारीपासून एअरसेल आपली सेवा बंद करणार आहे.एअरसेल कंपनी ६ सर्कलमध्ये आपली सेवा बंद करणार आहे. या सहा राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरातसोबतच इतरही राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे ट्रायने निर्धारित केलेल्या वेळेमध्येज युजर्सला आपला नंबर पोर्ट करावा लागणार आहे. म्हणजेच ३० जानेवारीपर्यंत ग्राहकांनी आपला नंबर पोर्ट करुन घ्यावा. ग्राहकांना नंबर पोर्ट करण्यासाठी मदत करा असे आदेशही ट्रायने कंपनीला दिले आहेत.

एअरसेल समूहातील एअरसेल लिमिटेड आणि डिशनेट वायरलेस लिमिटेडने ६ राज्यांमधील आपलं लायसन्स ट्रायला परत केलं आहे. ट्रायच्या नियमानुसार, लायसन्स परत केल्याच्या तारखेनंतर ६० दिवसांत एअरसेलची सेवा बंद करण्यात येईल. हा कालावधी ३० जानेवारी रोजी संपणार आहे. एअरसेलचे या सहा राज्यांत जवळपास ४० लाख ग्राहक आहेत. एअरसेल सेवा बंद करत असल्यामुळे या ग्राहकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल अंबानीने वीज व्यवसाय विकला