Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा

सावधान, 7 कोटी मोबाईल नंबर बंद होतील, हे काम 31 ऑक्टोबरपूर्वी करा
, शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019 (13:10 IST)
जर आपण एअरसेलचा मोबाइल नंबर वापरत असाल तर 31 ऑक्टोबरपूर्वी आपला नंबर दुसर्‍या कंपनीकडे पोर्ट करा. आपण हे न केल्यास आपला मोबाइल नंबर बंद होईल.
 
TRAIच्या अहवालानुसार एअरसेलचे सध्या सुमारे 70 दशलक्ष (7 कोटी) वापरकर्ते आहेत. जर त्यांनी निश्चित तारखेच्या आधी नंबर पोर्ट नाही केले तर त्यांचा फोन अचानक बंद होईल आणि त्यांना पोर्ट देखील करता येणार नाही.
 
उल्लेखनीय आहे की एरसेलने 2018 च्या सुरुवातीस आपले ऑपरेशन थांबवले होते. नंतर एअरसेलने TRAI कडे संपर्क साधला आणि वापरकर्त्यांना अतिरिक्त UPC (यूनिक पोर्टिंग कोड) सुविधा देण्यात आली, जेणेकरून वापरकर्ते सेवेचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा कंपनी बंद झाली, तेव्हा त्याचे 9 कोटी वापरकर्ते होते, त्यापैकी 2 कोटी लोकांनी आधीच आपला नंबर पोर्ट केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सेन्सॉरशिपवर भारत सरकार विचार करीत आहे