फोन आल्यानंतर मोबाईलची रिंग आता ३० सेकंद वाजणार आहे. तर दुरध्वनीच्या रिंगचा कालावधी ६० सेकंद असणार आहे. ट्रायने टेलिफोन सेवेत केलेल्या सुधारणेत हे नवे बदल करण्यात आले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईलची रिंग वाजण्याची वेळ २५ सेकंद केले होते. याआधी ही वेळ ४० ते ४५ सेंकद होती. Reliance Jio ने रिंग टाईम २० सेकंद करणाऱ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाद पाहायला मिळाला. आता ट्रायने सगळ्या टेलिकॉम ऑपरेटर्सला झटका देत फोनची रिंग वाजण्याची वेळ निश्चित केली आहे. ट्रायच्या आदेशानंतर आता ही वेळ ३० सेकंदाची असणार आहे.
ट्रायने इनकमिंग आणि आउटगोइंग या दोन्ही कॉल्ससाठी हा नियम लागू केला आहे. कॉलचं उत्तर मिळो अथवा ना मिळो पण रिंग ३० सेकंदापर्यंत वाजली पाहिजे. तर लॅडलाईनसाठी ही वेळ ६० सेंकद ठेवण्यात आली आहे. याआधी भारतात लॅडलाईनवर फोन रिंग वाजण्याची वेळ कोणतीही सीमा नव्हती. तसेच कॉल रिलीज मॅसेज न मिळल्यास ९० सेकंदानंतर अनअनसर्ड कॉल रिलीज करणं अनिवार्य असणार आहे.