Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 27 April 2025
webdunia

ट्विटरचे डार्क मोड आणखी डार्क

twitter dark mode now more darker
मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने आपल्या वचनानुसार डार्क मोड आणखी अधिक डार्क केले कारण की यापूर्वी काही वापरकर्त्यांनी डार्क मोडबद्दल तक्रार केली होती आणि सीईओ जॅक डॉर्सिने जानेवारीमध्ये वापरकर्त्यांपासून सुपर डार्क मोडशी जुळलेले वचन केले होते. ट्विटरने आपल्या अधिकृत हँडलरवर व्हिडिओ शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे. आता वापरकर्त्यांना ट्विटर अॅपवर विद्यमान डार्क मोड पेक्षाही अधिक डार्क थीम मिळेल. आधी पासून मिळणाऱ्या डार्क मोडमध्ये अॅप ब्लॅकऐवजी थोड्याशा निळ्या रंगात दिसायची, जे बऱ्याच वापरकर्त्यांना आवडले नाही.
 
आता सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय सामील केला आहे ज्यावर क्लिक केल्यानंतर वर्तमान डार्क मोड पिच-ब्लॅक थीमवर दिसू लागेल. ट्विटरने स्वतःच्या अधिकृत हँडलरवर व्हिडिओ पोस्ट करून या फीचरबद्दल माहिती दिली.
 
* यासाठी ट्विटर अॅप उघडा.
* सेटिंग्ज आणि प्राइव्हेसी सेक्शनमध्ये जा.
* येथे डिस्प्ले आणि साउंडवर क्लिक केल्यानंतर डार्क मोड ऑन करण्याची ऑप्शन मिळेल.
* हे चालू केल्यावर वर्तमान ब्लु-ब्लॅक थीम अॅपवर दिसेल.
* येथे नवीन दुसरा पर्याय लाइट आऊट देखील आहे. बल्बसारख्या या चिन्हावर क्लिक करताक्षणी अॅपचा डार्क मोड पूर्णपणे ब्लॅकवर आधारित असेल.
 
त्याच्या मदतीने बॅटरीची बचत होईल, ट्विट टेक्स्ट देखील यावर चांगले आणि व्हाईट कलर मध्ये दिसेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसीन अख्तर मीर पाकिस्तानी आहेत का? - फॅक्ट चेक