जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतल्यापासून ते चर्चेत आहेत. त्याची कमान हाती घेतल्यानंतर काही दिवसांनी इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.इलॉन मस्क यांनी आता ट्विटर मोफत वापरता येणार नाही, त्यामुळे काही किंमत मोजावी लागेल, अशी मोठी घोषणा केली आहे. भविष्यात, ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचे खिसे मोकळे करावे लागतील. तरी, हा प्लॅटफॉर्म नेहमी अनौपचारिक वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल.
इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले की ट्विटर कॅज्युअल वापरकर्त्यांसाठी विनामूल्य असेल, परंतु व्यावसायिक आणि सरकारी वापरकर्त्यांना थोडी किंमत मोजावी लागू शकते.
मस्कने अलीकडेच ट्विटरवर नवीन वैशिष्ट्ये जोडण्याबद्दल सांगितले. एका ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, त्यांना नवीन फीचर्स, ओपन सोर्स अल्गोरिदमसह ट्विटरला पूर्वीपेक्षा चांगले उत्पादन बनवायचे आहे. ट्विटरमध्ये भरपूर क्षमता आहे. ते कंपनीसोबत काम करण्यास उत्सुक आहे.