दिल्लीतील एका संस्थेनं खोट्या बातम्यांना आळा घालणाऱ्या अॅपवर काम सुरू आहे. या अॅपच्या मदतीनं बातमी खरी आहे की खोटी, हे वापरकर्त्यांना कळेल. या अॅपच्या मदतीनं व्हॉट्स अॅपवरील बातमीची पडताळणी केली जाईल.
दिल्लीतील इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकवणारे असोशिएट प्रोफेसर पोन्नूरंगम कुमारगुरू यांच्या नेतृत्त्वाखालील एक टीम सध्या नव्या अॅपवर काम करत आहे. व्हॉट्स अॅपवर शेयर होणाऱ्या बातम्यांची तथ्यता पडताळून पाहण्याचं काम हे अॅप करेल. त्यासाठी हे अॅप बातमीचा मुख्य स्रोत पडताळून पाहणार आहे. यासाठी एखाद्या व्हॉट्स अॅपवर वापरकर्त्यानं मेसेज 9354325700 क्रमांकावर पाठवल्यास त्याची पडताळणी केली जाईल. तो किती खरा आहे, हे पाहिलं जाईल. अॅपमध्ये हिरवा रंग झाल्यास मेसेज खरा आहे. पिवळा झाल्यास हा मेसेज डिकोड होऊ शकलेला नाही आणि मेसेज आल्यावर अॅपमध्ये लाल रंग दिसल्यास तो मेसेज खोटा असेल.