Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 2 May 2025
webdunia

व्होडाफोन देणार रमजान निमित्त 5 रुपयात अनलिमिटेड डेटा

vodafone
मुंबई , गुरूवार, 8 जून 2017 (17:10 IST)
रमजानच्या निमित्ताने टेलिकॉम कंपनी व्होडाफोन इंडियाने खास ऑफरची घोषणा केली असून व्होडाफोनने पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील स्थानिकांना ‘अनलिमिटेड शेअरिंग, अनलिमिटेड केअरिंग’ या ऑफरसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंगसोबत फ्री डेटा मिळवण्याची संधी दिली आहे.
 
रमजान स्पेशल नव्या ऑफरची घोषणा व्होडाफोनने केली आहे. यामध्ये 2G वापरकर्ते *444*5# डायल करुन ५ रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफर मिळवू शकतात. तर 3G वापरकर्ते *444*19# डायल करुन १९ रुपयात अनलिमिटेड डाटा ऑफरचा फायदा घेऊ शकतात. अनलिमिटेड डाटाशिवाय 2G वापरकर्ते 253 रुपयात अनलिमिटेड पॅकसोबत अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलचाही लाभ घेऊ शकतात.
 
२४५ रुपयात युजर्स अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसोबत १जीबी डेटाही मिळवू शकतात. तसेच लोकल आणि एसटीडी कॉलसाठी फक्त ३० पैसे प्रती मिनिट मोजावे लागतील. ही ऑफर ९० दिवसांसाठी लागू असेल. आमच्यासाठी रमजानचा पवित्र महिना खूप खास असून आम्ही यासाठी आमच्या युजर्सला लक्षात ठेवत हे पैसा वसूल पॅकेज आणले आहे. युजर्स आपले कुटुंब आणि मित्रांसोबत नव्या डाटा आणि कॉलिंग पॅक्ससोबत जोडले जातील. तसेच माफक दरात इंटरनेटचा फायदाही मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळावर अडकला तरी मदतीला येऊ : सुषमा स्वराज