Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मार्क झुकरबर्गच्या नजरेत मेटा म्हणजे काय?

मार्क झुकरबर्गच्या नजरेत मेटा म्हणजे काय?
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (13:47 IST)
मार्क झुकरबर्गने मेटाव्हर्सला व्हर्च्युअल वातावरण म्हटले आहे. झुकरबर्कच्या मते, आपण फक्त स्क्रीन बघून वेगळ्या जगात जाऊ शकता जिथे आपण व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट, ऑग्युमेण्ट  रिअॅलिटी गॉगल, स्मार्टफोन अॅप्स इत्यादीद्वारे लोकांशी कनेक्ट होऊ शकता, गेम खेळू शकता, खरेदी करू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करू शकता. Metaverse मध्ये, आपण साधारणपणे  ते सर्व काही करू शकाल जे सामान्य करतो. मेटाव्हर्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचे झुकेरबर्गने म्हटले आहे.
 
Metaverse म्हणजे काय?
मेटाव्हर्स हा आज अचानक प्रसिद्धीच्या झोतात आला असेल, पण तो खूप जुना शब्द आहे. नील स्टीफन्सन यांनी 1992 मध्ये त्यांच्या डायस्टोपियन कादंबरी "स्नो क्रॅश" मध्ये याचा उल्लेख केला होता. स्टीफन्सनच्या कादंबरीमध्ये, मेटाव्हर्सचा अर्थ असा होता की ज्यामध्ये लोक हेडफोन्स आणि  व्हर्च्युअल रियालिटी यासारख्या गॅझेट्सच्या मदतीने गेममधील डिजिटल जगाशी जोडलेले असतात. मेटाव्हर्स आधीच गेमिंगसाठी वापरला जात आहे. मेटाव्हर्समध्ये क्रिप्टोकरन्सी वापरल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, मेटाव्हर्स हे इंटरनेटचे एक नवीन जग आहे जिथे लोक उपस्थित नसले तरीही ते उपस्थित असतील,  मेटाव्हर्स पूर्ण होण्यास बराच वेळ लागेल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक ! पोटच्या मुलांना पेटवून महिलेची आत्महत्या