व्हॉट्सअॅपने युझर्सला 'पिन चॅट' नावं असलेले अ एक नवीन फिचर दिले आहे. यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तीन ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युझर्सला पिन करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही ग्रुप किंवा युझर्सला पिन करता तेव्हा हे ग्रुप किंवा युझर्स लिस्टमध्ये सर्वात वर येतात म्हणजेच या पिन केलेल्या ग्रुप किंवा युझर्सचे मेसेज आधी पाहिल्या जातील. म्हणजेच महत्त्वाचे मेसेज पाहिले नाही असे होणार नाही.
पिन चॅट या फिचर चा वापर करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करून घ्यावे लागेल. व्हॉट्सअॅप अपडेट झाल्यानंतर जेव्हा तुम्ही व्हॉट्सअॅप ओपन कराल तेव्हा ज्या महत्त्वाच्या ग्रुप किंवा व्हॉट्सअॅप युझर्सला तुम्हाला पिन करायचे आहे त्यावर टॅप करा. त्यानंतर वरील बाजूस पिनचा सिम्बॉल दिसेल त्यावर क्लिक केले कि झाला तो ग्रुप किंवा युझर्स पिन. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादा ग्रुप किंवा युझर्स अनपिन करायचा असेल तर परत त्यावर टॅप करा आणि वरच्या अनपिन सिम्बॉलला क्लिक केलं कि झालं.