Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता चेहरा आणि Touch ID ने Whatsapp होईल लॉक... रोल आउट झालं फीचर

आता चेहरा आणि Touch ID ने Whatsapp होईल लॉक... रोल आउट झालं फीचर
इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp ने आपल्या iOS प्लेटफॉर्मवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सपोर्ट दिले आहे. याने यूजरला Face ID किंवा Touch ID द्वारे अॅप लॉक करण्याची सुविधा मिळेल. हे फीचर प्रती चॅट आधारावर काम करणार नाही. सूत्रांप्रमाणे हे फीचर इनेबल करण्यासाठी यूजर्सचे खाजगी WhatsApp मेसेजेज Face ID किंवा Touch ID द्वारे लॉक करता येईल. हे फीचर WhatsApp च्या 2.19.20 व्हर्जनसोबत रोलआउट केले गेले आहे.
 
या प्रकारे वापरले जाईल फीचर : यासाठी सर्वातआधी iOS यूजर्सला WhatsApp चे 2.19.20 व्हर्जन डाउनलोड करावं लागेल. नंतर सेटिंग्समध्ये जाऊन अकाउंटवर जावं लागणार. आता प्राइव्हेसीवर टॅपकरुन Screen Lock ऑन करावं लागेल. तरी यूजर्स आधीप्रमाणे लॉक स्क्रीन नोटिफिकेशनद्वारे मेसेजचं उत्तर देऊ शकतील. सोबतच ऑथेंटिकेशन विनादेखील WhatsApp कॉल्सचे उत्तर देऊ शकतील.
 
WhatsApp ने अँड्रॉइड यूजर्ससाठी एक नवीन फीचर काढले आहे. यात स्टिकर्सच्या पूर्ण पॅकमधून यूजर्सला एक सिंगल स्टिकर डाउनलोड करता येईल. सध्या हे केवळ अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.19.33 साठी उपलब्ध आहे. यापूर्वी WhatsApp यूजर्सला एक स्टिकरमुळे पूर्ण पॅक डाउनलोड करावं लागत होतं परंतू नवीन अपडेटप्रमाणे आता यूजर्सला पूर्ण पॅकमधून एक स्टिकर डाउनलोड करण्याची सुविधा मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव