जर तुम्ही मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलसाठी व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वैशिष्ट्य मेटा-मालकीच्या इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर जारी करण्यात आले आहे, जे वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल दरम्यान फोनची स्क्रीन सामायिक करण्यास अनुमती देते. खुद्द मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने याची घोषणा केली आहे. झुकेरबर्गने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.
"आम्ही व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअरिंग सुरू करत आहोत," . मार्कने पोस्टसोबत एक स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे.
स्क्रीन शेअरिंग फीचर अशा प्रकारे काम करते
व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन शेअर करण्यासाठी, आधी व्हॉट्स अॅप उघडा.
आता तुमच्या संपर्कांसह व्हिडिओ कॉलिंग सुरू करा.
व्हिडिओ कॉलमध्ये, तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी एक स्क्रीन शेअरिंग आयकॉन दिसेल.
आता तुम्हाला स्क्रीन शेअर करायची आहे याची पुष्टी करा. स्क्रीन शेअरिंग सुरू होईल.
शेअरिंग थांबवा वर टॅप करून तुम्ही व्हिडिओ कॉल दरम्यान कधीही स्क्रीन शेअरिंग थांबवू शकता.