Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp Number Leak: 50कोटी व्हॉट्सअॅप नंबर लीक, ऑनलाईन विक्री सुरु

WhatsApp Number Leak:   50कोटी व्हॉट्सअॅप नंबर लीक, ऑनलाईन विक्री सुरु
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (13:03 IST)
84 देशांमधील सुमारे 500 दशलक्ष सक्रिय व्हॉट्सअॅप युजर्सचे नंबर हॅकर्सच्या हाती लागली आहे. हे नंबर हॅकिंग कम्युनिटी फोरमवर विकले जात आहेत. खरेदीदार हे नंबर मार्केटिंग, स्पॅम, फिशिंग किंवा फसवणुकीसाठी वापरू शकतो. एवढ्या मोठ्या संख्येने सक्रिय युजर्स चे नंबर युजर्सकडे कुठून आले हा मोठा प्रश्न आहे. 
 
तुमचा व्हॉट्सअॅप नंबरही कोणीतरी विकू शकतो असा तुम्ही कधी विचार केला आहे का? सायबर विश्वात या पैलूकडे लोकांचे लक्ष फार कमी आहे पण जिथे कमी लक्ष आहे, तिथे गुन्हेगार सक्रिय आहेत. सुमारे 500 दशलक्ष व्हॉट्सअॅप नंबरचा डेटा बेस सध्या विक्रीवर आहे.सायबर गुन्हेगार या क्रमांकांसाठी योग्य ग्राहक शोधत आहेत.  
 
अहवालानुसार, इजिप्तमध्ये 45 दशलक्ष, इटलीमध्ये 35 दशलक्ष युजर्स, सौदी अरेबियामध्ये 29 दशलक्ष युजर्स, फ्रान्समध्ये 20 दशलक्ष आणि तुर्कीमध्ये 20 दशलक्ष युजर्स आहेत.  डेटा बेसमध्ये 10 दशलक्ष रशियन युजर्स आणि 11 दशलक्ष यूके युजर्स फोन नंबर आहेत.हॅकर्सनी या डेटा बेसचा नमुना सायबरन्यूजच्या संशोधकांसोबतही शेअर केला आहे. या नमुन्यात, 1097 क्रमांक यूकेचे आहेत आणि 817 क्रमांक यूएस युजर्सचे आहे.संशोधकांनी हे नंबर देखील क्रॉस चेक केले आहेत आणि ते सर्व व्हॉट्सअॅपवर आहेत. हे नंबर कुठून मिळाले हे विक्रेत्याने सांगितलेले नाही. 

अहवालानुसार, विक्रेत्याने पुष्टी केली आहे की हे सर्व नंबर सक्रिय युजर्सचे आहेत. याप्रकरणी अद्याप मेटाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

FIFA World Cup 2022: विश्वचषकातील पराभवावरून गदारोळ, बेल्जियममध्ये दंगल सारखी परिस्थिती