Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

WhatsApp वर आला हा मेसेज तर लगेच डिलीट, हैकर्सला बँक अकाउंटची माहिती मिळू शकते

WhatsApp वर आला हा मेसेज तर लगेच डिलीट, हैकर्सला बँक अकाउंटची माहिती मिळू शकते
, बुधवार, 31 जुलै 2019 (17:14 IST)
तुमच्या पैकी जास्त करून लोक इंस्टेंट मल्टिमीडिया मेसेजिंग एप व्हाट्सएपचा वापर करत असतील. अशात तुमच्याजवळ दर रोज बर्याटच प्रकारचे मेसेजेस येत असतील.  व्हाट्सएपच्या माध्यमाने कोणतीही गोष्ट फारच लवकर पसरती आणि अफवा पसरवणारे लोक या गोष्टींचा फायदा घेतात. तुमच्यातील बरेच लोक असे ही असतील ज्यांच्याजवळ 1000 जीबी फ्री डाटा मिळण्याचे मेसेज आला असेल. तर काय आहे या मेसेजचे सत्य आणि काय खरंच तुम्हाला 1000 जीबी डाटा मिळेल. तर जाणून घेऊया.  
 
मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की WhatsApp आपल्या यूजर्सला 1000GB फ्री इंटरनेट देत आहे. या मेसेज सोबत डाटा क्लेम करण्यासाठी लिंक देखील देण्यात येत आहे. मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे की व्हाट्सएपचे 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनी हे ऑफर देत आहे.
 
मेसेजसोबत मिळणारे लिंक देखील बोगस आहे. लिंकचा यूआरएल व्हाट्सएपच्या डोमेनपेक्षा वेगळा आहे. अशात या लिंकवर तुमच्याबद्दल देण्यात येणाऱ्या माहितीचा थर्ड पार्टी प्रमोशनमध्ये होऊ शकतो. त्याशिवाय या लिंकच्या माध्यमाने तुमच्या फोनमध्ये एप इंस्टॉल करवून बँक डिटेल घेण्यात येऊ शकते आणि तुमची फसवणूक होऊ शकते. अशात या लिंकवर क्लिक करणे म्हणजे धोक्याची घंटी वाजवण्यासारखे आहे.
 
व्हाट्सएपने या मेसेजबद्दल स्पष्टपणे म्हटले आहे की कंपनी कुठलेही फ्री डाटा देत नाही आहे आणि हा मेसेज फेक आहे. व्हाट्सएपने म्हटले आहे की या मेसेजवर विश्वास करू नये आणि लिंकवर क्लिक करून कुठलीही माहिती देऊ नये.
 
welivesecurity च्या शोधकर्त्यांना अद्याप या गोष्टीचा कुठलाही प्रमाण मिळालेला नाही आहे की हैकर्सया मेसेजसोबत देण्यात येणार्या लिंकच्या फोनमध्ये वायरसइंस्टॉल करवत आहे, पण तुमच्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही स्वत:ची कुठलीही वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये.    
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आणि आदित्य ठाकरे यांना असा प्रश्न विचारला