Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता व्हॉट्सअॅपवर व्हॉईस रेकॉर्डिंग शक्य

आता व्हॉट्सअॅपवर व्हॉईस रेकॉर्डिंग शक्य
आता व्हॉट्सअॅपवर चांगल्या पद्धतीने  व्हॉईस रेकॉर्डिंगसाठीही एक नवं फिचर आणलं असून यामुळे व्हॉईस रेकॉर्डिंग करणे सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅप अपडेट लॉक्ड रिकॉर्डिंग (Locked Recording) हे फिचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने युजर्स व्हॉईस रेकॉर्ड करु शकतात. यासाठी युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना रेकॉर्डचे बटन दाबून ठेवावे लागते. मात्र आता नव्या अपडेटमध्ये पूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन दाबून ठेवण्याची गरज नाही. एकदाच बटण प्रेस करुन रेकॉर्डींग सुरु करा आणि संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक केल्यास पूर्ण रेकॉर्डिंग मिळू शकेल.
 
या नव्या फिचरची चाचणी सुरु असून ती झाल्यानंतर हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध होईल असे सांगण्यात आले आहे. तसंच या नव्या अपडेटमुळे व्हॉईस रेकॉर्डिंग पाठविण्याआधी आपल्याला ऐकता येणार आहे. त्यामुळे त्यात काही राहीले असल्यास किंवा चुकले असल्यास नव्याने रेकॉर्ड करुन पाठविता येणार आहे. युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विरानुष्काचा फोटो वाईरल, ४४ मिनिटांत ६ लाखांहून अधिक लाइक्स