स्मार्टफोन सगळेच वापरतात. तसेच कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅप वापरतात. कंपनीने नवीन वर्षाच्या पूर्वी आपल्या युजर्सला झटका दिला आहे. कंपनी म्हणाली की, जवळपास 50 स्मार्टफोन्समध्ये 31 डिसेंबर नंतर व्हॉट्सअॅप काम करणार नसून कायमचे बंद करणार आहे. तसेच आता कंपनीने काही फोन्सची लिस्ट जारी केली असून, वर्ष 2022 नंतर या हँडसेटमध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. यामध्ये अँड्राइड स्मार्टफोन आणि काही आयफोन मॉडेल्सचा समावेश आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, जुन्या आणि आऊटडेटेड ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणाऱ्या फोन मध्ये व्हॉट्सअॅप सेवा मिळणार नाही. या मध्ये सॅमसंग ,एप्पल, सारख्या स्मार्टफोनमध्ये 31 डिसेंबर नंतर व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नसून या फोन मध्ये हे बंद करण्यात आले आहे.