येत्या काही दिवसात एअर इंडिया देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा उपलब्ध करुन देण्याचा विचार करत आहे. एअर इंडियाच्या ‘ए-320’ या विमानातून याची सुरुवात केली जाणार आहे. एअर इंडियाने अशाप्रकारे वायफाय सुरु केल्यास, विमानात वायफाय पुरवणारी एअर इंडिया देशातील पहिली विमान कंपनी ठरणार आहे.
“आम्ही आमच्या विमानांमध्ये वायफाय सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान बनवणाऱ्या कंपनीकडून सुरक्षिततेबाबत हिरवा कंदिल मिळाला की सेवा सुरु केली जाईल. वायफाय विमानात कशाप्रकारे सुरु करता येईल, यावर विमान बनवणाऱ्या एअरक्राफ्ट उत्पादकांशी चर्चा सुरु आहे. नेमकी तारीख सांगणं कठीण आहे, पण जून किंवा जुलैपर्यंत देशांतर्गत विमानांमध्ये वायफाय सेवा सुरु केली जाईल.”, अशी माहिती एअर इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांनी सांगितले.