Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्लो इंटरनेटसाठी YouTube Go लॉन्च

स्लो इंटरनेटसाठी YouTube Go लॉन्च
खास भारतासाठी बनवण्यात आलेलं मोबाइल अॅप YouTube Go लॉन्च करण्यात आलं आहे. गुगलने बाबत माहिती दिली. या अॅपद्वारे स्लो इंटरनेट असेल तरीही व्हिडीओ पाहताना बफरिंग होणार नाही असा दावा करण्यात आला आहे. या अॅपला आम्ही भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती म्हणून पाहत आहोत कारण भारतात अजूनही फास्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी एक मोठी समस्या आहे असं कंपनीने म्हटलं आहे.  

यु ट्यूब या मुख्य अॅपचं YouTube Go हे लाइटर व्हर्जन आहे. या अॅपद्वारे व्हिडीओ डाऊनलोड करणं आणि शेअर करणं अगदी सहज शक्य होणार आहे. लाइटर व्हर्जन असल्याने अॅप वापरताना युजरला जास्त कंट्रोल मिळेल तसेच स्लो इंटरनेट स्पीड असेल तरीही अॅप योग्य प्रकारे काम करेल असा दावा करण्यात आला आहे. या अॅपचं बीटा व्हर्जन उपलब्ध आहे, गुगल प्ले स्टोअरवरून बीटा व्हर्जन डाऊनलोड करता येऊ शकेल. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिओचा आणखी एक धमाका, DTH सर्विस सुरू करणार